शरद पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरु, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती दौऱ्यावर

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे.
Sharad Pawar,Chandrasekhar Bawankule
Sharad Pawar,Chandrasekhar BawankuleSaam Tv
Published On

पुणे: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची (Election) तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपने आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदार संघाला लक्ष केले आहे. या मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मिशन बारामती संदर्भात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती (Baramati) दौऱ्यावर येणार आहेत.

खासदार शरद पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत आज भाजप बैठक घेणार आहे. या बैठकीत आज रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक (Election) समितीची बैठक होणार आहे. बारामती (Baramati) मतदार संघासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आज पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर येत आहेत.

Sharad Pawar,Chandrasekhar Bawankule
Accident News| मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात; २ जण जागीच ठार

आज मंगळवारी दिवसभर विविध पूर्वनियोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार असून त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची माहिती घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार असल्याचा सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Election) बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा या महिन्यात दौरा नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Sharad Pawar,Chandrasekhar Bawankule
'आमदार विकत घेऊन आणलेल्या सत्तेचा उत्सव करायला अमित शहा मुंबईत आलेत'

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी ८.३० वा. कन्हेरी मंदिरला भेट देतील. सकाळी ९.१५ वा. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधतील. सकाळी १०.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रॅलीत सहभागी होतील. सकाळी ११.०० वा. कसबा येथील युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन करतील.

सकाळी ११.२० वा. भाजप कार्यालयास भेट देतील. दुपारी १२.३० वा. मुक्ताई लॉन भिवगन रोड येथे भाजप जिल्हा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तर दुपारी १.३० ते २.०० राखीव. दुपारी २.३० वा. मुक्ताई लॉन येथेच लोकसभा कोअर टीमची व दुपारी ३.३० वा. सोशल मीडिया बैठक घेतील. सायंकाळी ५.३० वा. माळेगाव येथे बुथ बैठक घेतील. सायंकाळी ६.३० वा. मारेगाव गणपती मंदिरात दर्शन घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com