मुबंई: भाजप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ट्रोल करत आहे, पण जनता महागाईवरून भाजपला ट्रोल करत आहे. आज भय आणि भूक हा महत्वाचा विषय असून भारतात किती लोक जोडले जातात हे येत्या काळात दिसेल. भाजप (BJP) परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलत असतो. ते फक्त राजकारण करू पाहत आहेत असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पत्रकार परिषदेत केलं.
तसंच चीन अरूणाचल आणि लदाखमध्ये घुसखोरी करत आहे अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी ओळखावी. आज ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले आहेत. देव त्यांना बुद्धी देवो हीच प्रार्थना असं म्हणत पटोले यांनी गृहमंत्र्यांना (Amit Shah) टोला लगावला.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, 'भाजप हा संविधानीकतेला न माणणारा देश आहे. महामहिम हे भाजपसाठी काम करतात. महाराष्ट्रातील मराठी माणसाला शिव्या देणं, थोर महात्म्यांची अवहेलना करणं हे लोकांना दिसत आहे. लोकशाहीमध्ये जनता ही महत्वाची आहे आमदारांना विकत घेऊन सत्ता आणली त्याचा उत्सव करायला शहा मुंबईत आले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
शिवाय ७ सप्टेंबरपासून सुरु होणारी 'भारत जोडो' यात्रा ही राजकिय नाही. देशातली लोकशाही संपवायला निघालेल्या मोदी सरकारच्या विरोधातली यात्रा आहे. यापूर्वी काँग्रेसचा स्वबळावर महापौर बसत होता. शाह यांनी काय बोलावं, हा त्यांचा प्रश्न आहे. खुद्द शहांनी देशाच्या पाटीत खंजीर खुपसला असल्याचंही ते म्हणाले.
कोरोना काळात राहुल गांधी व सोनिया गांधी वेळोवेळी कोरोनाबाबत आवाहन करत असताना भाजपचे लोक थाळ्या पिटत व दिवे लावत होते. नमस्ते ट्रम हे कोण करत होतं. भाजप महागाईवर बोलत नाही. भाजपने गरीबी महागाई यावर बोलणं अपेक्षित आहे. मात्र, त्यावर न बोलता हिंदु-मुस्लिम हा वाद निर्माण केला जातोय. हे सरकार फार काळ राहणार नाही. हे ईडी सरकार जाणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.