uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनिती काय असू शकते?

उद्धव ठाकरे आणि गटाची पुढची रणनिती काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई :  शिवसेना  पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र याही परिस्थितीतून सावरण्याचं ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार आहे.

मात्र पक्ष आणि चिन्ह दोन्ही हातून गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि गटाची पुढची रणनिती काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांना असा निकाल येऊ शकतो असा अंदाज होता, असं दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहेत.  (Political News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट जनतेत जाऊ शकतो. जनतेकडून ठाकरे गट पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवू शकतो. जेणेकरुन लोकांच्या मनातलं नाव आणि चिन्ह पक्षाला मिळू शकेल.

पुन्हा जनेतसमोर जाऊन नव्याने पक्षाची उभारणी ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते. ज्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची सहाणुभूती मिळवून पक्षविस्तार वेगाने केला जाऊ शकतो.

याशिवाय नव्याने पक्ष उभारणी करण्यासाठी राज्यभरात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. यामुळे ठाकरे गटाकडून पक्षसंघटाना बळकट केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रीमंत होण्यासाठी 5 सोप्या टिप्स, ज्या प्रत्येकांसाठी महत्वाच्या

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती संगम कार्यक्रम स्थळी दाखल

मुंबईकरांचा रविवारचा प्रवास खोळंबणार! ट्रान्स-हार्बर सेवा बंद, मध्य रेल्वेवर ५ तासांचा मेगा ब्लॉक; 'या' गाड्यांचे मार्ग बदलले

Drinking water quality: पाणी स्वच्छ दिसतंय म्हणून निर्धास्त राहू नका; तुमच्या घरच्या पाण्यात हे धोकादायक घटक असू शकतात!

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या 'त्या' निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर

SCROLL FOR NEXT