uddhav thackeray news  Saam tv
मुंबई/पुणे

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

uddhav thackeray shiv sena split : फुटीर खासदारांच्या बैठकीचा पहिला फोटो समोर आला आहे. या बैठकीत ३ फुटीर खासदार दिसत आहेत.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर आला आहे. फुटीर खासदारांचा पहिला फोटो 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे. या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील दिसून येत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत हे फुटीर खासदार दिसून येत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्या रणनीतीतून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा आहे. मागच्या काही महिन्यांपासून 'ऑपरेशन टायगर'ची रणीनिती आखली जात होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दिल्लीमधल्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती. या बैठकीतील बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

SCROLL FOR NEXT