uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही, पण...; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास आपणास सध्या करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

मुंबई : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु तुमची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला (Shivsena) संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. (Uddhav Thackeray News In Marathi )

मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली.

एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी बोलताना त्यांचे मन भावुक झाले होते. त्या म्हणाल्या की 'यापुढे आपण एक जुटीने व ताकतीने काम करायचे आहे.' ऊद्धव ठाकरेंची भेट व त्यांची साद यांनी पुण्याच्या शिवसैनिकांना जिंकले आहे.

दरम्यान, ठाणे, कल्याण सारख्या भागातील अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे आमदारांसोबत माजी नगरसेवक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे शिवसेनेला या राजकीय संकटातून उभारी मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT