MP Rahul Shewale Case Saam TV
मुंबई/पुणे

Rahul Shewale Case: शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार? महिला आयोगानं थेट पोलीस आयुक्तांना लिहीलं पत्र

Shivsena MP Rahul Shewale Case: खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा करत एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: शिवसेना (ShivSena) खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा करत एका महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत कारवाई होत नसल्यानं आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं (Maharashtra State Commission for Women) या प्रकरणाची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आता खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणींत वाढ होऊ शकते. (Shivsena MP Rahul Shewale Crime News)

हे देखील पाहा -

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, खासदार राहुल शेवाळे यांच्याविरुद्ध एका युवतीने दाखल केलेल्या तक्रारीबाबत साकीनाका पोलीस ठाणे, मुंबई यांच्याकडून कारवाई होत नसल्यामुळे या युवतीने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. त्याबाबत आज, गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या मुंबई कार्यालयात बैठक घेण्यात आली.

अर्जदार युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्या मुंबईत येऊ शकत नाहीत असे कळविल्याने पीडितेने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आपली बाजू मांडली. एप्रिल 2022 पासून ही तरुणी पोलिसांनी तिची तक्रार घ्यावी म्हणून सातत्याने विनंती करूनही पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे तसेच राजकीय दबावामुळे कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर तक्रारीबाबत साकीनाका पोलीस कारवाई करण्यास सक्षम नसल्याचे आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे.

यासंबंधी वरिष्ठ स्तरावरून तपास करण्यात यावा यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती महिला आयोग्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. या प्रकरणात आता थेट राज्य महिला आयोगाने उडी घेतल्याने राहुल शेवाळेंच्या अडचणींत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते, त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून, याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती, असं या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेऊन ११ जुलै २०२२ रोजी सदर महिलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता. आणि तिला सुमारे ८० दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे, असंही यात म्हटले आहे.

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते!

- सौ. कामिनी राहुल शेवाळे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT