Vinayak Mete Saam TV
मुंबई/पुणे

विनायक मेटेंचा अपघात की घातपात ? शिवसेना खासदाराने केली 'ही' मागणी

'राज्यामध्ये सत्तांतर झालं. मात्र, एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. '

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झालं. मेटे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशातच आता या अपघातावर शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

विनायक मेटेंचा अपघात आहे की घातपात, अशी शंका व्यक्त करत या घटनेच्या चौकशीची मागणी सावंत यांनी केली आहे. विनायक मेटे यांचा अचानक अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

राज्यामध्ये नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राज्यामध्ये सत्तांतर झालं. मात्र, एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. याबाबत त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक काल त्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलं, कोणी बोलावलं होतं? कशासाठी याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.

आरोपांची चौकशी होणार - एकनाथ शिंदे

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल. पण ही झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी वगैरे या सगळ्या गोष्टी होतील असं म्हटलं आहे.

विनाय मेटेंचे निधन मनाला वेदना देणारे - उद्धव ठाकरे

तर मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे ; ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो . अशा शोकभावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT