Shiv Sena MLA Disqualification Saam Digital
मुंबई/पुणे

Mla Disqualification Result : उद्धव ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी राहणार अनुपस्थित, कारणही आलं समोर

Political News : सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई, निवडणूक आयोगातील लढाई आणि विधान भवनातील अध्यक्षांच्या समोरील सुनावणी या सगळ्या लढाईत या दोन्ही नेत्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्याचं राजकारण ढवळून निघालेल्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल आज हाती येणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक प्रश्नाची उत्तरे आजच्या निकालानंतर सर्वांना मिळतील. मात्र या निकालाआधी ठाकरे गटाच्या दोन नेत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र उद्धव ठाकरेंचे दोन खंदे शिलेदार हे आजच्या निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत. अनिल देसाई हे कोल्हापुरात आहेत; तर अनिल परब मुंबईबाहेर असणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई, निवडणूक आयोगातील लढाई आणि विधान भवनातील अध्यक्षांच्या समोरील सुनावणी या सगळ्या लढाईत या दोन्ही नेत्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती.

एक-दीड तास निकालाचं वाचन

थोड्याच वेळात म्हणजे ४.३० वाजता आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनास सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एक ते दीड तास निकालाचे वाचन करणार आहेत. निकालातील ठळक मुद्दे आधी वाचले जाणार आहेत. (Latest Marathi News)

निकालाची तिसरी शक्यता

मात्र निकालाआधीच दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे. शिंदे गट निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावा करत आहे. तर ठाकरे गट निकाल आधीच ठरला असल्याचा दावा करत आहेत. मात्र अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे की, निकाल कुणाच्याही विरोधात लागणार नाही. सुप्रीम कोर्टात फैसला करावा, असा निर्णय अध्यक्ष देऊ शकतात. तर एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळण्याती शक्यता आहे, अशी सामच्या सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT