Manisha Kayande Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री; मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

भाजपतर्फे भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री परिषद दिल्लीत आयोजिक केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपतर्फे भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री परिषद दिल्लीत आयोजिक केली होती. या परिषदेत महाराष्ट्राकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेच्या (ShivSena) मनिषा कायंदे यांनीही यावरुन टोला लगावला. ' दिल्लीत मुख्यमंत्री परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे, म्हणजे एकनाथ शिंदे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत, असं ट्विट मनिषा कायंदे यांनी केले आहे.

या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे. या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपने (BJP) मुख्यमंत्री बैठक बोलावली आणि त्यात एकनाथ शिंदे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. मग राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे हे कळत आहे. असा सवालही कायंदे यांनी केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्विटला उत्तर दिले. कायंदे म्हणाल्या, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खरे उद्धव ठाकरेच पुढे नेत आहेत, असंही कायंदे म्हणाल्या.

सध्या राज्यभरात आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला आता भाजप घाबरली आहे. त्यामुळे आता भाजपने आदित्य ठाकरे मंत्री असलेल्या पर्यटन विभागाची आता केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, असा आरोपही कायंदे यांनी भाजपवर (BJP) केला. अब्दुल सत्तार यांना निवडणूक लढवायची होती, मग ते ज्या काँग्रेसमध्ये होते. तेथून का लढले नाहीत. सेनेकडे एबी फॉर्म मागायला का आले? असा सवालही कायंदे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT