Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Elections Results: त्यांनी ज्या "नोटा" वापरल्या त्याच्या पुढे आम्ही कमी पडलो- संजय राऊत

त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापेक्षा आम्ही कमी पडलो.. हे खरंय कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई : 5 राज्यांचा निवडणुकांचा निकाल सध्या समोर आलेला आहे. प्रचारावेळी शिवसेनेकडून सांगण्यात आले होते की, यावेळेस सत्त्तापालात होईल. परंतु निकालानंतर असे काही दिसून आलेले नाही. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडे नोटा होता त्याच्या पुढे आम्ही कमी पडलो म्हणून आमचा पराभव झाला असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासह त्यांनी आम्ही लढत राहू ही लढाई काही संपली नाही, असही राऊत म्हणाले.

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राऊत म्हणाले, "पंजाबमध्ये आपचा, ऐतिहासिक, क्रांतिकारी विजय झाला आहे. राजनीतीमध्ये ज्याचा विजय होतो त्याचा अभिंनदन करण्याची परंपरा या देशात आहे. यामुळे ज्या राज्यात ज्या पक्षाचा विजय झाला आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. काँग्रेसचे पार्टीची पंजाबमध्ये वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंड मध्ये जेवढी अपेक्षा होती त्याच्या पण पराभव झाला आहे. अखिलेश यादव आणि त्यांचा अलायन्सचा जो परफॉमन्सची अपेक्षा होती. पण अपेक्षेपेक्षा कमी परफॉर्मन्स झाला." (Sanjay raut rection on Punjab election)

...त्यामुळे दिल्लीत 'आप'ला फायदा;

दिल्लीत जे केजरीवाल यांनी काम होते त्यामुळे तेथे त्यांचा फायदा झाला. तर, काँग्रेस पक्षाचे इलेक्शन मॅनेजमेंट पंजाबमध्ये होते ते ठीक नव्हते. BJP चा जो विजय आहे तो त्यांच्या इलेक्शन मॅनेजमेंटचा विजय आहे असे मी मानतो. आज लोकांनी विकल्प शोधण्याचा पर्याय निवडला.

...कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या;

नोटापेक्षा कमी मत शिवसेनेला मिळाली, महाराष्ट्रातील मुख्य भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टिका होत आहेत यावर राऊत म्हणाले, "त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापेक्षा आम्ही कमी पडलो.. हे खरंय कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. पंजाबमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणजे मोदी आणि शहांचा चेहरा. तरीही पंजाबमध्ये भाजपला कोणत्या प्रकारचं यश मिळालं याच उत्तर द्यावं. नोटांपेक्षा कमी मत मिळालं तर आमच्याकडे नोटा कमी मिळाल्या. तरी आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात ज्या पद्धतीने लढलो, आम्ही लढलो, ही लढाई चालू राहिल. विजय पराजय अंतिम नसतो. ही सुरुवात असते. सेनेच्या बाबतीत ही सुरुवात आहे, भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू." (Sanjay Raut on 5 state assembly election result)

राऊत एकूणच राज्यांच्या निकालावर भाजपला उद्देशून म्हणाले,"या निकालाने विजय प्राप्त झाला असला, भाजपनं विजय पचवायला शिकले पाहिजे. काही लोकांना विभाज्य पचवता आला पाहिजे नाहीतर त्या विजयाचे अजीर्ण होते. आणि मग त्रास होतो. माझी अपेक्षा आहे लोकांनी दिलेला विजय पचवा. सुडाने काम न करता देशाचं आणि राज्यच हित पहा," असा सल्ला राऊतांनी भाजपला दिला आहे.

पुढे राऊत म्हणाले, "उत्तर प्रदेशात जर चांगल्या प्रकारे विरोधकांना एकत्र आणता आलं नाही. भविष्यात विरोधी पक्ष काम करताना नियोजनपूर्वक विचार करु. काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल. उत्तर प्रदेशात मोठा असंतोष होता मात्र फायदा घेता आला नाही. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू. मगाशीच म्हणालो अजिरणाच्या ढेकरा आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना आवाहन देण्याऐवजी मीच तुम्हाला आवाहन देतो की तुम्हीच निवडणून आणून दाखवा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT