Assembly Election Results 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने विजयी झाली आहे. गोव्यातील सर्व 40 विधानसभा जागांसाठी भाजप (BJP) सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) 5 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष उमेदवार 03 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि आम आदमी पार्टी (AAP) या निवडणुकीत प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत (Pravin Darekar Criticize Shivsena And Sanjay Raut Over Goa Assembly Election Result).
शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोवा निवडणुकीपूर्वी (Goa Election) अनेक मोठमोठे दावे केले होते. गोव्यात महाविकास आघाडीचं सरकार असणार असं ते म्हणाले होते. मात्र, गोमंतकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा नोटाला अधिक पसंती दिल्याचं चित्र आहे. यावरुन आता विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केलीये.
नोटा इतकीही मतं मिळाली नाहीत - दरेकर
"संजय राऊत तर गोव्यात मुख्यमंत्री बसवणार या अविर्भावात बोलत होते. आता तर त्यांना आणि राष्ट्रवादीला नोटा इतकीही मतं मिळाली नाहीत", असं म्हणत प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
महाराष्ट्रात नक्कीच बदल होईल - दरेकर
"जनतेने भाजपला मोठा कौल दिला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, झारखंड निकालानंतर बदलाचे वारे अधिक गतीने वाहतील. महाराष्ट्रात नक्कीच बदल होईल", असं ते म्हणाले. "काहींना केवळ केंद्रीय तपास यंत्रणाच दिसत आहेत", असंही दरेकर म्हणाले.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.