Eknath Shinde And sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

आज दिल्लीत १२ खासदारांनी शिंदे गटाला पांठिबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर विविध आरोप केले. त्यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आज दिल्लीत १२ खासदारांनी शिंदे गटाला पांठिबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर विविध आरोप केले. त्यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut News In Marathi )

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यासह १२ खासदारांवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय सांगत असतात. महाविकास आघाडीच्या वेळेला देखील युती कोणत्या परिस्थितीत करतोय हे सांगितले. महाविकास आघाडी करण्याची वेळ हे भाजपने आणलेली आहे. त्यावेळी वेळ ही भाजपने लादलेली. म्हणून महाविकास आघाडीशी युती करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात सांगितले. तेव्हा या सगळ्यांनी या प्रयोगाचे स्वागत केले'.

'ज्यांनी ठाकरेंचा शब्द पाळला नाही, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याची संधी आहे. हे सर्व सांगणारे हे लोक आहेत. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या बंद दाराआड चर्चा झाली. त्यातला बराचसा भाग आम्हाला सांगितला. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं कायम होतं. आज १२ खासदार मुख्यमंत्र्यांसोबत बसले होते. त्यांना विचारू इच्छितो की, २०१४ साली आपण सर्व कुठे होता ? जेव्हा भाजपने युती तोडली, तेव्हा तुम्ही युतीमध्ये होता ना ?,असा सवाल राऊतांनी १२ खासदारांना केला.

'२०१४ साली भाजपने युती तोडली, त्याला शिवसेना जबाबदार नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या भाषेत हल्ले करण्यात आले. यापैकी किती खासदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले ? गेल्या अडीच वर्षात भाजपने ठाकरे कुटुंबावर शाब्दिक हल्ले केले, तेव्हा हे खासदार कुठे होते ? आम्ही कोणत्याही आघाडीत नाही. हे वारंवार सांगितले. आम्ही स्वातंत्र्य मार्ग निवडला होता. युतीचा शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. मात्र, भाजपने युतीचा शब्द पाळला नाही. एकनाथ शिंदेंची फसवणूक कोणी केली असेल, तर भाजपने केली आहे', असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT