sanjay raut ED Custody Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: संजय राऊतांना दिलासा नाहीच; ED कोठडीत वाढ

संजय राऊतांना आणखी १४ दिवस कोठडीत राहावे लागणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडी कोठडीत आहेत. याच प्रकरणी राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आजही राऊतांना दिलासा मिळाला नसून आता त्यांना आणखी १४ दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.

राऊत सध्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीत असून त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाकडून राऊतांना दिलासा मिळालेला नाही. कारण त्यांची कोठडी २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ -

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने HDIL च्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT