Dipali Sayyad Saam TV
मुंबई/पुणे

Dipali Sayyad : दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, भेटीनंतर शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चांवर म्हटलं...

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे दिपाली सय्यदही शिवसेनेला राम राम ठोकणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आपण केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर बोलताना दिलापी सय्यद यांनी म्हटलं की, मी शिवसेनेत अजिबात नाराज नाही. मी जे करतेय ते कृतीतून समोर येतं. मी कुणावरही नाराज नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न खूप केले. मात्र मोठ्या नेत्यांना मनात काय असेल आपण सांगू शकत नाही. आता नाहीतर भविष्यात तरी दोन्ही नेते एकत्र यावेत, अशी इच्छा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना दिपाली सय्यद यांनी म्हटलं की, उद्धव साहेब दौऱ्यावर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो हीच शुभेच्छा. त्यांनी हे दौरे आधी सुरु केले असते तर चांगलं झालं असतं. हे दौरे त्यांनी आधीच सुरु केले असते, प्रत्येकाला त्याची जागा दिली असती, प्रत्येकाला सांगितलं असतं की, ही जागा घेऊन सुरुवात करा. आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ओळखून त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या असत्या तर आजचं चित्र वेगळं असतं.

मातोश्री पर्यंत आवाज पोहचत नाही

मातोश्रीपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. तिथे आवाज रोखणारे बरेच लोक आहेत. ते कोण आहेत सर्वांनाच माहित आहे. याबद्दल लवकरच सविस्तर सांगेल. उद्धव साहेबांपर्यंत पोहोचणं या लोकांमुळे थोडं कठीण होतं, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT