Maharashtra Political Crisis News, Dada Bhuse Latest Marathi News
Maharashtra Political Crisis News, Dada Bhuse Latest Marathi News Dada Bhuse
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis : कृषिमंत्री दादा भुसे आसाममध्ये, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावं; राऊतांचे सूचक ट्विट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या; असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Dada Bhuse Latest Marathi News)

शिवसेनेशी बंड करुन सध्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेले सेनानेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गोटात सामिल होणाऱ्या बंडखोर आमदारांचा आकडा हळूहळू वाढत आहे. मात्र, ज्यावेळी मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यानंतर शिवसेनेतील नेत्यांना धक्का बसला होता.(Maharashtra Political Crisis News)

त्यामुळे दादा भुसे कोणाचे हा प्रश्न निकाली लागला आहे. पण भुसे ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचं महत्वाचं काम ज्या हंगामात असतं त्या हंगामामध्येच राज्याचे कृषीमंत्र्यांनीच बंडखोरी केल्यामुळे राज्यातील शेतीविषयक निर्णय ऐन खरीप हंगामात रखडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी भुसे यांच्यावर निशाणा साधला असून याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, 'खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या; असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांचे फार पूर्वीपासून एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. तरुण काळात ठाणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्याच्या नोकरी करत असताना भुसे यांचा संपर्क आनंद दिघे यांच्याशी झाला होता. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन भुसे हे समाजकारण आणि राजकारण करीत असताना त्यांची आणि एकनाथ शिंदेची मैत्री घट्ट झाली होती. शिवाय धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात देखील या दोघांच्या मैत्रीचे किस्से दाखविण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

Hardik Pandya : रोहित शर्माला हार्दिक पंड्यानं संघाबाहेर बसवलं की आणखी काही? इन्टरेस्टिंग इनसाइड स्टोरी

Tanaji Sawant |तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांचं केलं "असं" वर्गीकरण!

Balasaheb Thorat News | 13 पैकी एखाद जागेवर महायुतीचं खात उघडणार?

Vastu Tips: स्वयंपाकघरात 'या' वस्तु ठेवल्यास होईल घरातील वातावरण नकारात्मक

SCROLL FOR NEXT