Balasaheb Thorat News | 13 पैकी एखाद जागेवर महायुतीचं खात उघडणार?

Balasaheb Thorat On NDA | आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमधून महायुलीला एखाद जागा मिळणार! थोरात असं का म्हणाले?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील उंबरे गावात सभा पार पडली. या सभेतून बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि महायुतीवर हल्लाबोल केला. भाजप प्रचारात धर्माचं राजकारण करतं, असं मुळ मुद्द्यांना बाजुला सारत नको त्या मुद्द्यांवर पंतप्रधान भाष्य करतात. असही थोरात म्हटले. यावेळी त्यांनी पंतप्रधांनी शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. त्याचबरोबर आत्तापर्यंत 13 जागांवर झालेल्या निवडणुकांपैकी महायुतीची एखादी जागा निवडून आली तर येईल. असा गौप्यस्फोट बाळासाहेब थोरात यांनी केला. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com