Aditya Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

आपल्याला सत्याच्या बाजूने राहायचं आहे, सत्तेच्या नव्हे; आदित्य ठाकरेंचा नव्या कार्यकर्त्यांना सल्ला

'राज्याचा विकास थांबला आहे घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : आपल्याला सत्याच्या बाजूने राहायचं आहे, सत्तेच्या नव्हे असं वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. आज कांदिवली, बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवा सेनेत केला प्रवेश केला यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून काही शिवसैनिक (Shivsainik) शिंदे गटात जात आहेत. तर काही ठाकरेंच्या शिवसेनेत जात आहेत. अशातच आज कांदिवली, बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवरती आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर निशाणा साधला. हे सरकार तात्पुरत असून हे सरकार पडणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणावे, 'मला ताप आला आहे. त्यामुळे मी अधिक बोलत नाही. राज्यात लोकांनी निवडलेले सरकार राहिलेले नाही. राज्यात दोन लोकांचे जंबो सरकार आहे.

कधी माईक खेचला जात आहे तर कधी चिठ्ठी दिली जाते. राज्यात पूरपरिस्थिती आहे पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही. शिवाय हे सरकार तात्पुरतं असून हे सरकार पडणार असल्याचं ते म्हणाले. राज्याचा विकास थांबला आहे घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे. आपण जिंकणार हे निश्चित असल्याचंही आदित्य यावेळी म्हणाले.

दरम्यान, तसंच ही लढाई राज्याची किंवा केवळ शिवसेनेची नाही. तर ही लढाई देशाची आहे. येणारा निकाल २० ते ३० वर्षांसाठी लागू होणार आहे. शिवाय न्यायालयाच्या निकलानंतर इतर राज्यात स्थिरता की अस्थिरता हे समजणार आहे. आपल्याला सत्याच्या बाजूने राहायचं आहे सत्तेच्या बाजूने नव्हे असं आदित्य म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT