सुमित सावंत
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसोबत बंडाचा झेंडा फडकविल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील २ हजार नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांना जेवायला जायचं सांगून पळवून नेलं,असा खुलासा आदित्य ठाकरेंनी नगरसेवकांना संबोधताना केला. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )
'मला वाटलं मुंबईचे नगरसेवक असतील, पण नंतर कळलं सगळेच महाराष्ट्रातील नगरसेवक आपले उपस्थित आहेत, जेव्हा फूट पडते तेव्हा उत्साह नसतो , पण परवापासून म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं तेव्हापासून लोक रस्त्यावर उतरून शिवसेनेसाठी लढायचं आणि जिंकायचं असं बोलताना दिसले. प्रत्येक महिन्याला सर्वांसोबत बसून सामान्यांचे प्रश्न सोडवत आलो, इतर शहरात नगरपालिका, महानगर पालिका कोविड काळात केलेलं काम संपूर्ण देशाने पाहिले, असं आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील नगरसेवकांना संबोधताना सांगितले.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, ' ५० टक्के आमदार गेलेले परत येतील, काहींना जेवायला जायचं सांगून घेऊन गेले.मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लढाईसाठी तयार राहायला सांगितलं. काही दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी ही कुरबुर ऐकली, तेव्हाच त्यांना बोलावून तुम्हाला हवं तर मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं.पण काही राक्षसी , महत्वकांक्षा बाळगणाऱ्यांनी हे केलं. त्यांची पुढची वाट म्हणजे त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही, भाजपमध्ये विलीन झाल्या शिवाय पर्याय नाही. शिवसेनेची भूमिका प्राण जाय पण वचन न जाय अशी आहे'.
'आपण पुढे जात असतात बंड केलेले तिथून सुटून परत येतील त्यांना घेऊन पुढे जायचं. नितीन देशमुख परत आले, त्यांनी काय झालं ते सांगितलं. काही रुसवे फुगवे असतील, तर सूरत आसाममध्ये जाऊन बंड केलं नसतं. सेना प्रमुखांशी प्रथा आहे , त्यानुसार पक्ष प्रमुखांकडे बोलायचं होत. पुढे लढत जायचं आहे , जिंकत जायचं आहे. आपण का , कोणासाठी लढतोय ? ते आपल्याला कळलं. मागचे दोन्ही बंड आपण पाहिले तेव्हा आपण जिंकलो आहोत. नंतर झालेले बंड दोन वर्षात त्यांचं काय झालं आणि आता ते कुठे आहेत ते आपल्याला ठाऊक आहे. आपलं सरकार आता आलं, आपण कामं करतोय. आपलं कर्तव्य बनतं कामं करणं', असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
'शिवसेनेची आपण बांधणी करतोय, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी काम करायचं, जे सोबत नाहीत ते आपले विरोधक नगरसेवकांची ही ताकत आहे. पण रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक आपण पाहिले, अनेक बंड विरोधातून सत्तेत जाण्यासाठी असतात , पण हे पाहिलं बंड सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे. हृदयावर आणि मनावर सत्ता गाजवणारे म्हणजे आपले मुख्यमंत्री आहे , जिथे जिथे गेलो तिथे उद्धव साहेबांचे कौतुक लोक करत होते. राजकीय नाही, तर सर्वसामान्य लोक उद्धव साहेबांचे कौतुक करतात ही मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
'जे सर्व्हे झाले , कुठे अभ्यास झाला , त्यात उद्धव साहेब पहिल्या क्रमांकावर असलेले आपले मुख्यमंत्री आहेत , लोकांची कामं करणारे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाली आहे, अशा वेळी बंड केला , पण ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. तन मन लावणारे लोक आपल्याला हवेत, प्राईस टॅग लावलेले नकोयत. ईडी, सीबीआय यंत्रणा लावल्या जातात , पण शिवसैनिक म्हटल्यावर संघर्ष लढा नवीन आपल्याला नाही, आदित्यजी काही करा पण मविआचं सरकार देशासाठी महत्वाचं आहे, असं लोक बोलतात. आपण महाराष्ट्र पुढे नेत राहिलो ,सगळे सोबत आहात का ? जर सगळे सोबत असाल तर भगव्या रंगात वातावरणात आपण निवडणूक साजरी करू', असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.