मुंबई/पुणे

Video|... पण आम्हाला मुंबई आमची आई, आमची कर्मभूमी आहे; आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई त्यांच्यासाठी मलई असेल, त्यांना मलई दिसते. पण आम्हाला मुंबई आमची आई, आमची कर्मभूमी आहे, अशा शब्दात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

Aaditya Thackeray News : : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरणासहित मुंबईतील राजकारणही बदललं आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवण्याची रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे, आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'शिवसेनेच्या शाखा मुंबईच्या आन आणि शिवसेनेची लाईफ लाईन आहे. काही जण म्हणतात की, 'मुंबईची हंडी फोडणार आणि मलई वाटणार'. त्यांच्यासाठी मलई असेल, त्यांना मलई दिसते. पण आम्हाला मुंबई आमची आई, आमची कर्मभूमी आहे, अशा शब्दात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या तीन शाखांचं उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'शाखेचं उद्घाटन करताना आनंद होतोय. शिवसेनेच्या शाखा मुंबईच्या आन आणि शिवसेनेची लाईफ लाईन आहे. काही जण म्हणातात की, 'मुंबईचा महापौर आमचाच होईल'. मुंबई आर्थिक राजधानी, सत्ता केंद्र आहे. पण ती महाराष्ट्राची राजधानी आहे, हे विसरून चालणार नाही. 'मुंबईची हंडी फोडणार आणि मलई वाटणार आहे' असंही ते म्हणतात. त्यांच्यासाठी मलई असेल, त्यांना मुंबई मलई दिसते. पण आम्हाला मुंबई आमची आई, आमची कर्मभूमी आहे'.

'सगळे उद्धव ठाकरेंना बघायला विधान भवनात येत होते. उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो, तेव्हा बरेच जण पुन्हा यायला इच्छुक आहेत. मातोश्रीत या असंच जंगी स्वागत होईल. कुटुंब प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जात असेल, तर ते उद्धव साहेब. आपल्याला आपली कामे लोकापर्यंत पोहोचवायची आहेत', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. 'एकनाथ शिंदे हे तात्पुरत्या सरकारचे आहेत. खरे मुख्यमंत्री कोण याबाबत काहीच कळत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 'हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. या तात्पुरत्या सरकारला निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. कारण विजय आपला होणार हे त्यानं ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयात धडकी भरली आहे,असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT