aditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Pune : उद्धव ठाकरे यांना एकटं पडू देणार का ? आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

महाराष्ट्राची जनता हेच सर्व ठाकरे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पडू देणार का ? मला सांभाळणार ना ? असे सवाल करत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.

विश्वभूषण लिमये

पुणे : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आणि पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. शिवसंवाद निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांची 'शिवसंवाद निष्ठा यात्रा' पुण्यात पोहोचली. आजच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. 'ठाकरे कुटुंब एकटं पडू शकत नाही. कारण महाराष्ट्राची जनता हेच सर्व ठाकरे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांना एकटं पडू देणार का ? मला सांभाळणार ना ? असे सवाल करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. ( Aditya Thackeray News )

आदित्य ठाकरे यांची 'शिवसंवाद निष्ठा यात्रा' आज पुण्याच्या कात्रजमध्ये पोहोचली. शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या आवारातच आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे म्हणाले, 'गद्दारांना उत्तर द्यायला त्यांची पात्रता नाही आहे. ते आज पुण्यात फिरत आहेत. ही लढाई सरकारची नाही. सत्तेसाठीच्या राक्षसी महत्वाकांक्षेची आहे'. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'या राज्यात केवळ दोघांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. यांना ३३ व्या दिवशी देखील तिसरा माणूस मिळाला नाही. या दोघात खरा मुख्यमंत्री कोण हे त्यांनाही कळत नाही. मात्र, एका महिन्यानंतर हे सरकार कोसळणारच. असं सरकार महाराष्ट्रात टिकणार नाही. गद्दार ,संधीसाधूंना या महाराष्ट्रात जागा नाही', असे आदित्य म्हणाले.

बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'आदित्य निळा शर्ट घालतो म्हणून बाहेर आलो, असे म्हणायला देखील हे गद्दार मागे पुढे पाहणार नाहीत'. यावेळी आदित्य यांनी शिवसैनिकांना भावनिक साद देखील घातली. 'ठाकरे कुटुंब हे एकटं पडू शकत नाही. कारण महाराष्ट्राची जनता हेच सर्व ठाकरे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पडू देणार का ? मला सांभाळणार ना ? असे सवाल करत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली

'दिल्लीने तुम्हाला नाकारलं आहे. आत्तापर्यंत जे तुमचं होतं, ते शिवसेना, भगवा ध्वज आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळं होतं. आता यांनी माणुसकीशी गद्दारी केली आहे. गद्दार आमदार-खासदार दिवाळीमध्ये घरी येऊन जेवून गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं पहिलं ऑपरेशन झालं होतं. त्यावेळी परदेशात मी पर्यावरणावरील परिषदेला गेलो होतो. त्यानंतर त्यांचं तातडीने दुसरं ऑपरेशन झालं. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे शरीराची हालचाल करू शकत नव्हते. तेव्हा ते सोशल मीडिया माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेत होते. जेव्हा उद्धव ठाकरे यांना कोरोना झाला, तेव्हा ते बंडखोर आमदार सूरतला पळून गेले. शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून या आणि जर कोणाला परत आमच्यासोबत यायचं असेल तर मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत', असे ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी ३२ वर्षांच्या तरुणांसोबत उभे राहण्याचं देखील आवाहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Like And Subscribe: अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ OTT वर होणार रिलीज! कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra News Live Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

SCROLL FOR NEXT