Shivsena Fire Aaji Saam TV
मुंबई/पुणे

साहेब काळजी करू नका, शिवसैनिक तुमच्या पाठीशी; फायर आजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शिवसेनेच्या फायर आजी मातोश्रीवर पोहचल्या आहेत.

Satish Daud

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, शिवसेनेच्या फायर आजी (Shivsena Fire Aaji) मातोश्रीवर पोहचल्या आहेत. यावेळी आजीबाईंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. सर्व शिवसैनिक (Shivsena) तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे काळजी करू नका, असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. इतकंच नाही तर, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर मला खूप वाईट वाटलं मी खूप रडले' असं या आजीबाईंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. (Shivsena Fire Aaji Latest News)

फायर आजी काय म्हणाल्या?

'मी त्यांना सांगितलं की, तुम्ही काही काळजी करू नका. शिवसैनिक तुमच्या पाठिशी आहेत. तो (एकनाथ शिंदे) रिक्षावाला होता. रिक्षा चालवता चालवता तो आमदार झाला, खासदार झाला, त्यानंतर तो शिवसेना सोडून गेला. त्याला यायचं असेल तर तो येईल ना... बाळासाहेबांचा आदेश त्यांना असेल ना. तर तो परत येईल उद्धव साहेबांना भेटायला माफी मागायला. अहो... मी रात्री साहेब आले तेव्हा रडले. आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहोत'. असं फायर आजींनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, भाजपसोबत सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम असून ते भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट पडले. विशेष बाब म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत राज्यभरातील शिवसैनिकांसह नागरिकांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी हवं असेल तर, मुख्यमंत्रीपद सोडतो पण तुम्ही परत या असं भावनिक आवाहन बंडखोर आमदारांना केलं होतं. मात्र, त्यांच्या आव्हानानंतर देखील अनेक आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. आमदारांपाठोपाठ जवळपास 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT