Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शिवसेना कुणाची? आता 30 जानेवारीला होणार फैसला! आज काय घडलं?

आजही शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांच्या वकिलांंकडून याबद्दल जोरदार युक्तीवाद झाला. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता ही सुनावणी ३० जानेवारी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. (Latest Marathi News)

गेल्या ६ महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची? यावर सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेना पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचं काम सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे सोपावलं आहे. आज निवडणूक आयोगासमोर याबाबत महत्वाची सुनावणी पार पडली.

यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  गटाच्या वकीलांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा निवडणूक आयोगासमोर केला. दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.

वकिलांमध्येच शाब्दिक चकमक

आयोगासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक झाली. युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? असा प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला.

कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली. ज्यानंतर वाद निवळला आणि पुन्हा सुणावनीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच, मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT