Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

...तर तुम्हाला शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर म्हणायचं का? शिंदे गटाचं ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटाच्या दसरामेळाव्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक खुर्ची स्टेजवर ठेवण्यात येणार आहे.

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: संपुर्ण राज्यचे लक्ष शिवसेनेच्या आजच्या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागलं आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. शिवाय भाजपाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबई पालिका कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गट हा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची टीका ठाकरे गटाकडून शिंदे गटावर करण्यात येत आहे. याच टीकेला आता शिंदे गटाचे प्रतोद आणि उपनेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पाहा व्हिडीओ -

गोगावले म्हणाले, जे आम्हाला अमित शहा यांच्या ताटाखालचे मांजर म्हणत आहेत त्यांना आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताटाखालील मांजर म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित करत भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

दरम्यान, आजच्या शिंदे गटाच्या दसरामेळाव्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने एक खुर्ची स्टेजवर ठेवण्यात येणार असून, बाळासाहेबांचे विचार, आचार आम्ही पुढे नेणार आहोत, शिवाय हिंदु धर्माच्या परंपरेनुसार जीवंत माणसाची खर्जी ठेवत नाहीत, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या खुर्जीवरुन ठाकरेंना टोला लगावला.

तसंच एकनाथ शिंदेंचे काम कसं असतं ते आजच्या गर्दीवरुन कळेल. त्यांच्याकडे आलेले लोक बघून ठाकरे गटाचे डोळे फिरले आहेत त्यामुळे काहीतरी बोलायच म्हणून ते आमच्यावर काहीही टीका करत असल्याचंही गोगावले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT