Uddhav Thackeray/Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली? उद्धव ठाकरे म्हणाले...

सरकार कोसळल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर मुलाखत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी संजय राऊत यांनी एक प्रश्न विचारला तो म्हणजे फुटिरांचा असाही एक आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक.

हे देखील पाहा -

गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

फुटिरांचा आक्षेप हाच आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले…

मी आता मुख्यमंत्री होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT