Uday Samant Saam Tv
मुंबई/पुणे

दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; सामंतांवरच्या हल्ल्यानंतर CM एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant News )

'गाडीवर दगड मारून पळून जाणे म्हणजे मर्दुमकी नाही. हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचे काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

पुण्यातील कात्रजमध्ये उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची काच फुटली आहे. उदय सामंत यांनी या हल्ल्याची तक्रार कोथरूड पोलीस (Police) स्थानकात केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधीच पोलिसांनी नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

वाहनावर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी साम टिव्हीशी संवाद साधला. त्यावेळी उदय सामंत म्हणाले, ' माझा ताफा कोणी अडवला नव्हता. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलला गाडी थांबल्यानंतर काही तरुण बेसबॉलची स्टीक आणि हातात दगड घेऊन आले''हल्लेखोरांनी माझ्या वाहनावर हात मारायला सुरुवात केली. मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी वाहनाच्या मागच्या बाजूने वाहनाची काच फोडली.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ओला दुष्काळाबाबत आम्ही राज्याच्या शेवटच्या टोकपर्यत पोहोचलो आहे. सगळी माहिती घेतली मदत केली आहे. पूर होता तेव्हा गेलो, सरकर संवेदनशील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT