Shivsena-BJP New Advertisement Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: वादानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात; दिग्गज नेत्यांसह फडणवीसांचाही फोटो झळकला

Shivsena-BJP New Advertisement: आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena-BJP New Advertisement: ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीवरून वाद झाला होता. त्यानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याशिवास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो जाहिरातीत झळकला आहे. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असा दावा सुद्धा जाहिरातून करण्यात आला आहे. तर ४९.३० टक्के जनतेचा शिंदे-भाजप सरकारला आर्शिर्वाद आहे, असंही या जाहिरातीत म्हटलं आहे.

‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली होती. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत आहे.

यावरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीनंतर आता भाजप-शिवसेना (Shivsena) युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. त्यामुळे आता जाहिरातीचा हा वाद इथेच थांबणार की आणखी लांबणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिंदेंच्या जाहिरातमध्ये नेमकं काय होतं?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. (Maharashtra Political News)

मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार... असं शिंदे यांच्या जाहिरातीत म्हटलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT