Shivsena Bhavan Dadar
Shivsena Bhavan Dadar Saam TV
मुंबई/पुणे

ShivSena Bhavan Dadar: शिंदे गटाकडून थेट मातोश्रीला आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे मुख्यालय म्हणजे दादरमधील 'शिवसेना भवन' आणि याच शिवसेना भवनामधून शिवसेनेचा कारभार बाळासाहेब ठाकरेंपासून (Balasaheb Thackeray) चालत आला आहे. आता देखील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असल्याचं बोललं जात तसंच शिवसेना भवन म्हणजे शिवसैनिकांसाठी एका मंदिरासमान आहे.

पण शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं . दरम्यान खासदार नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांना देखील फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला. आता तर शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन उभारून थेट मातोश्रीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ -

बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन ज्या दादर मध्ये आहे , त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार आहेत , अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सर्वणकर (Sada Sarvankar) यांनी दिली आहे.

शिंदे गटात इन्कमिंग सुरू आहे. आता शिंदे गटाच लक्ष मुंबई महानगरपालिकेवर (BMC) आहे आणि त्यासाठीच प्रति शिवसेना भवन, प्रति शाखा महिन्याभरात उभारल्या जाणार आहेत. एवढ्यावरच न थांबता मुंबईतील शिवसेनेचे 40 ते 45 नगरसेवक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी संपर्क साधून त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं सदा सर्वांकर यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे आता प्रति शिवसेनाच उभारण्याकडे भर देत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण त्यात त्यांना किती यश येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल . दरम्यान, शिंदे गटाकडून केवळ दादरमध्येच नाही तर कुलाब्यातही शिवसेना भवन उभारणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. दादर आणि कुलाब्यात सेनाभवनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून दादरमधील शिंदे गटाच हे आताच्या सेनाभवनापासूनच जवळच असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Today's Marathi News Live : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

SCROLL FOR NEXT