सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, शिवसैनिकांना नितेशराणेंचा चॅलेंज Saam Tv
मुंबई/पुणे

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, शिवसैनिकांना नितेशराणेंचा चॅलेंज

शिवसैनिकांना नितेशराणेंचा चॅलेंज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधामध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मुंबई Mumbai आणि कोकणामध्ये Konkan तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना ShivSena हा संघर्ष आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर युवा सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सर्व युवा सैनिकांना जुहू या ठिकाणी जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळेच मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे Nitesh Rane यांनी तसे ट्विट Tweet केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू Juhu येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत.

यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी Police शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीमध्ये पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी थेट शिवसेनेला चांगलेच डिवचले आहे. यामुळे आता मुंबईमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT