Ambadas Danve-Bhagat Singh Koshyari Saam tv
मुंबई/पुणे

Governor Resign: महाराष्ट्रातून घाण गेली, राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अंबादास दानवेंची सडकून टीका

देर आये दुरस्त आये असंच म्हणावं लागेल.

साम टिव्ही ब्युरो

Governor Bhagat Singh Koshyari Resign : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांच्यावर सडकून टीका कर त्याच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे.

देर आये दुरस्त आये असंच म्हणावं लागेल. राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अवमान करत होते. राज्यपालांची हकालपट्टी करा आम्ही सातत्याने मागणी केली होती. त्यांनी देखील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला. एका अर्थाने महाराष्ट्रातून घाण गेली, अशी जहरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

राज्यापालांचा राजीनामा जनभावना होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. राज्यपालांविरोधात अनेक आंदोलने झाली होती.त्यामुळे उशीरा का होईना हा निर्णय झाला आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT