shivsea leader arvind sawant gives ultimatem to rebel 16 mla Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम; १६ आमदारांवर होणार कायदेशीर कारवाई

Political Crisis In Maharashtra : चिमण पाटील, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर अशी एकूण १६ नावं आहेत त्यामुळे आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता शिवसेनेने कायद्याची मदत घेत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने विधानसभेचे उपाद्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहीलं आहे. यात एकनाथ शिंदे Eknath Shinde) गटातील १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत परत या अन्यथा कारवाई करु असं म्हणत शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी ही माहिती दिली आहे. अरविदं सावंत म्हणाले की, ते आमदार आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत त्यामुळे आता त्यांना गट स्थापन करता येणार नाही. याबाबत आम्ही उपाध्यक्षांनी पत्र दिलं होतं. आज त्यांना आम्ही सर्व समजावून सांगितलं आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील वाचा -

एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर कारवाई करण्याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेना सोडून पाठीत सुरा खुपसून काहीजण गुवाहाटीला जाऊन लपले आहेत आणि तिकडूनच दावा करत आहेत, की आम्हीच खरे शिवसैनिक अहोत. उद्धव ठाकरे यांनी आव्हान केलं की, तुम्ही या अणि बोला. मी खुर्ची सोडू शकतो असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. त्यामुळे आम्ही आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि १६ आमदारांवर ही कारवाई होणार आहे. यात चिमण पाटील, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर अशी एकूण १६ नावं आहेत त्यामुळे आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम

बंडखोरीबाबत अरविंद सावंत यांनी भाजपला जबाबदार धरत बंडखोरांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, कमळा बाईकडे गेला तर कायम तुम्ही भगव्याला मुकला हे त्यांनी लक्षात घ्यावं अशी बोचरी टीका सावंतांनी केली आहे. तसेच आता त्यांच्या परतीच्या दरवाजाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील असही सावंत म्हणाले. त्याचप्रमाणे उद्यापासून (शनिवार) सर्वांना नोटीसा जातील आणि त्यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात येईल यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं म्हणत शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शेवटी बोलताना सावंत म्हणाले की, आता त्यांचा (बंडखोरांचा) शिवसेनेचा मार्ग देखील संपला आहे. आता त्यांनी प्रहारमध्ये जावं अन्यथा भाजपमध्ये जावं असा खोचक टोला त्यांनी बंडखोरांना लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT