मुंबई: कट्टर शिवसैनिक आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आजचा पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांबाबत (MLA) अनेक बातम्या येत आहेत. सोशल मीडियावरही विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशात एकनाथ शिंदेंसोबत गेलेले बंडखोर आमदार हे गट प्रवक्ते (Spokespersons) नियुक्त करणार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची नावं लवकरच जाहिर करण्यात येणार आहेत. हे प्रवक्तेच बंडखोर आमदारांच्या गटाकडून माध्यमांसमोर भूमिका मांडणार आहे. माध्यमांसमोर बंडखोर आमदारांची योग्य भूमिका यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील वाचा -
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर माध्यमांत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. यातील काही बातम्या या चुकीच्या ठरल्या आहेत. सोबचत समाज माध्यमांवरही अनेक फेक मेसेजेस व्हायरल होतायत. अशात शिंदे गटाच्या भूमिकेबाबत राज्यातील जनतेत मोठा संभ्रम आहे. शिंदे गटाची भूमिका नेमकी काय याबाबत अद्यापही १०० टक्के स्पष्टता नाही. ही स्पष्टता आणण्यासाठीच शिंदे गटाकडून प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रवक्त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना माध्यमांसमोर बंडखोरांची अधिकृत भूमिका मांडता येणार आहे, त्यामुळे केवळ प्रवक्त्यांनाच माध्यमांसमोर शिंदे गटाची भूमिका मांडता येणार आहे. यामुळे बंडखोरांची नेमकी भूमिका जनतेला कळेल आणि खोटी माहिती पसरण्यास आळा बसणार आहे.
२० जूनला विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील एका हॉटेला थांबले होते. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेत ते बंडखोर आमदारांसह २२ जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ते बंडखोर आमदारांसह थांबले आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष आणि इतर १० असे एकूण ५० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकजून करण्यात आला आहे. आज बंडाचा पाचवा दिवस असून रोज नवनवीन घटना घडतायतय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.