Ashish Shelar saam tv
मुंबई/पुणे

Shivjayanti In Mumbai : भाजपकडून मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये शिवजयंतीचे आयोजन, 'जय जय शिवराया'चा जयघोष घुमणार

Shivjayanti In Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मान सोहळ्यात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shivjayanti in Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393व्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला भाजपा तर्फे मुंबईतील 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या आरतीचा महाजयघोष करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मान सोहळ्यात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन शेलार यांनी केले आहे. शेलार म्हणाले की, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले.

त्याचप्रमाणे आता शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्त मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी जय जय शिवराया... या सावरकरांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष केला जाईल.

मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले आहे. त्याची माहिती देखील आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत असे शेलार यांनी यावेळी सांगितले.

कुठे कुठे किती कार्यक्रम होणार?

उत्तर पश्चिम जिल्हात 58, उत्तर पूर्व 50, उत्तर मध्य 63, उत्तर मुंबई 69, दक्षिण मध्य 44, दक्षिण मुंबई 62 असे एकुण 346 ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम साजरा होणार आहे. यातील 36 ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वरळी नाका, माटूंगा स्टेशन, शिवाजी पार्क, राम नगर-मालाड (प), भायखळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, दहिसर, आनंद नगर, शहाजीराजे क्रीडांगण-मालाड, लोखंडवाला-कांदिवली आणि खार (प) या ठिकाणांचा समावेश आहे.

आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव

मराठेशाहीच्या इतिहासात अतिशय महत्वाचा असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल आशिष शेलार यांनी मोदी सरकारचे देखील अभिनंदन केले आहे. याच किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. येथील ‘दिवाण-ए- आम’मध्ये यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष खुमणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT