Shivena flag and amit Shah  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; सेनेच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट

शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे टेन्शन वाढलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडळीनंतर पक्षात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या खासदार देखील बंडाच्या तयारी आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे काही खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे टेन्शन वाढलं आहे. (shivsena MP meets Amit shah News )

गृहमंत्री अमित शाह हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे. तर या निवासस्थानाला एक मागच्या बाजूला प्रवेशद्वार देखील आहे. तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेच्या एकूण ११ खासदार गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भेटीत कोणत्या खासदारांनी कोणत्या मुद्यांवर कधी आणि कसं पत्र द्यायचं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडायचे यासंदर्भातील चर्चा या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी सेनेच्या एका तरुण आणि उच्चशिक्षित खासदाराने व्यूहरचना केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

अमित शाह यांच्याकडे ११ खासदारांना घेऊन जाणारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास समजला जातो. त्यामुळे सदर शिवसेनेचा तरुण आणि उच्चशिक्षित खासदार कोण प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादा वाघ होते पण त्यांची नखं भाजपने काढली, उत्तम जानकरांची बोचरी टीका

Pune Election : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

Viral Video: हे प्रभु ! एक्सीलेटरवरुन येण्याची नवीन पद्दत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

SCROLL FOR NEXT