Sudhir Mungantiwar saam tv
मुंबई/पुणे

शिवरायांचा 'तो' वाघनख ब्रिटनमधून भारतात आणणार; सुधीर मुनगंटीवारांनी दिली महत्वाची माहिती

वाघनख देखील राज्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, अशी महत्वाची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Sudhir mungantiwar News : जगदंब तलवारीप्रमाणे आता अफझल खान याचा कोथळा ज्या वाघनखाने काढण्यात आला, तो वाघनख देखील राज्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, अशी महत्वाची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानंतर आता अफझल खान याचा कोथळा वाघनख आणण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाची माहिती दिली.

सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, अफजल खान याच्या समाधीचे आम्ही अतिक्रमण हटवले आहे. अफझल खान याची समाधी माँ जिजाऊ यांच्या म्हणण्यानुसार तिथे बनवली होती. ज्या वाघनखाने अफझल खान याचा वध करण्यात आला, ती नखे ब्रिटनमध्ये आहेत. आम्ही त्याचे सर्टिफिकेट घेतले आहे'.

'जगदंब तलवार आणि वाघनख आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारची मदत घेऊ, अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली. ' ६ जून २०२४ रोजी राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यावेळी ती जगदंबा तलवार आणण्याचा जसा प्रयत्न आहे. तसाच वाघनख आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. त्याला किती यश येईल हे सांगता येत नाही. पण आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT