shivaji hole, nagar crime news, kotwali police station
shivaji hole, nagar crime news, kotwali police station saam tv
मुंबई/पुणे

Nagar Crime News : नगर- पुणे रस्त्यावर गाेळीबार, एकाचा मृत्यू; तिघांचा शाेध सुरु

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सुशिल थोरात

Nagar Crime News : नगर शहरातील केडगाव बायपास रोडवर तीन अज्ञात चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन हजार रुपयांसह मोबाईल (mobile) चोरीस (theft) केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नगर पुणे रोडवरील (nagar pune road) केडगाव बायपास रोडवर एका हॉटेल नजीक रात्री उशिरा अरुण शिंदे आणि शिवाजी होले हे एका हॉटेलच्या आडोश्याला मद्यपान करीत होते. त्यावेळी तेथे तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात लोक दाेघांजवळ आले.

त्यांनी अरुण शिंदे आणि शिवाजी होले (shivaji hole) यांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. शिवाजी होले यांनी या तिघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटपटीत शिवाजी होले यांच्यावर तिघांपैकी एकाने बंदुकीतून गोळीबार केला.

शिवाजी होले यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यावेळी अरुण शिंदे यांनी तिथून पळ काढून पोलिसांना संपर्क केला. कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT