ujjwal Nikam Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? आजच्या सुनावणीत काय होणार? उज्ज्वल निकम यांनी मांडलं मत

आजच्या सुनावणीआधी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Crisis Latest News : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणी होईल. शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? १६ आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. घटनापीठ यासंदर्भात काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीआधी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आपलं मत मांडलं आहे. (shivsena news supreme court)

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार नाही, एक-एक करून याचिकांवर विचार होईल, असं ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल, याची शक्यता कमी असल्याचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. (maharashtra supreme court hearing today)

वेगवेगळ्या प्रकरणांची खिचडी झाली आहे. अनेक प्रकरणांचा संपूर्ण अंगानी घटनापीठासमोर विचार केला जाईल, त्यानंतर निकाल येऊ शकेल. निवडणूक आयोगाला पुढील कारवाई करण्यासाठी स्थगिती द्यावी की नाही, याचा विचार घटनापीठाला करावा लागणार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Maharashtra News Live Update: श्रीकांत शिंदे नेस्को सेंटरमध्य दाखल

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

भीषण अपघात! 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागली; 5 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT