Shivsena Uddhav thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाकडून 'ती' मागणी मान्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे, साम टीव्ही

Shivsena Political Crisis : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची धनुष्यबाण कुणाला मिळणार? यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. माहितीनुसार, ७ ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आता ठाकरे गटाला मुदत मिळाली आहे.

२३ सप्टेंबरला ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी (Maharashtra News) निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला वेळ वाढवून दिली आहे. २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर शिवसेनेकडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी मान्य करत ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं म्हणणं ७ ऑक्टोबरपर्यंत मांडावं लागणार आहे.

ठाकरेंना धनुष्यबाण मिळून नये म्हणून शिंदे गटाची नवी चाल?

अंधेरी पूर्वच्या (Andheri) पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाण (Shivsena) चिन्ह मिळू नये म्हणून आता शिंदे गटाकडून सुद्धा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे.

एकाच चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाची काल वर्षा निवास्थानी बैठक झाली. या बैठकीत ही रणनिती झाली असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : अडचणीचा सामना करावा लागणार; 5 राशींच्या लोकांना मनोबल सांभाळावे लागेल

Cricketer Fraud : क्रिकेटपटूकडून ३५ लोकांना कोट्यवधींचा गंडा; इंजिनीअर मित्रानेही दिली साथ, नेमकं प्रकरण काय?

Hair Care: केस खूप फ्रिजी झालेत? मग ट्राय करा 'हा' होममेड मास्क, २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि शायनी

Maharashtra Live News Update: मॅरेथॉनमध्ये धावले सोलापूरकर होम मैदान ते धावण्याच्या मार्गावर ‘सकाळ’चे कौतूक

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT