Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद; सामनातून टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर 'सामना'तून शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर 'सामना'तून (Uddhav Thackeray) शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय.'महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडय़ाची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. अशी टीका सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

'मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवटय़ामागे भ्रष्ट, बेइमान गेंडय़ाची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडय़ाची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!, असा संताप सामनातून व्यक्त करण्यात आलाय.

'अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही. भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला'. अशी टीका सामनातून भाजपवर करण्यात आली. (Tajya Batmya)

भाजपला मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितले, ‘मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळविण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख, अरुणाचल प्रदेशातील जमिनीवर ताबा मिळवा.’ आम्ही सांगितले, ‘मुंबई देशाचे पोट व तिजोरी भरतच आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा. तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. असं सामनातून रोखठोकपणे मांडण्यात आलंय.

ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही. शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप देखील सामनातून व्यक्त करण्यात आलाय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, एक ठार

ना पाणी - ना जेवण, फक्त बिअर, बायकोसोबत डिव्होर्स अन् दुरावा सहन झाला नाही; शेवट झाला भयानक

Avika Gor: बालिका वधूचा 'आनंदी'चा हटके लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT