Sushma Andhare Saam tv
मुंबई/पुणे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील खासगी रुग्णालयात केलं दाखल

sushma andhare news : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Akshay Badve

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड

त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात केलं दाखल

रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती हाती आली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीने कारवाई सुरू केली होती.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरवात झाली होती. मागील वर्षी त्यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा हे समितीसमोर हजेरी लावत आहेत.

हक्कभंग समितीची उद्या गुरूवारी देखील सुनावणी होणार आहे. परंतु सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल असल्याने त्या उद्या होणाऱ्या हक्कभंग समितीच्य कारवाईसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती हाती आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून विधीमंडळाला पत्र पाठवण्यात येणार आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेमकं काय झालं?

सुषमा अंधारे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अंधारे यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली आहे का?

सुषमा अंधारे यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; उसाला प्रतिटन 4200 रुपये दर मिळणार

सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

SCROLL FOR NEXT