Shiv sena Uddhav Thackeray Group MP Omraje Nimbalkar narrowly escaped Truck accident Saam TV
मुंबई/पुणे

Omraje Nimbalkar: भरधाव टिप्पर आला अन्... ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले; घातपात की अपघात? तपास सुरू

Shivsena MP Omraje Nimbalkar News: ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena MP Omraje Nimbalkar News: धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ओमराजे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी (Police) टिप्परचालकाला ताब्यात घेतलं असून हा अपघात की घातपात? याची चौकशी पोलीस करीत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते.

त्याचवेळी अचानक भरधाव वेगात एक टिप्पर आला. हा टिप्पर अंगावर येत असल्याचं पाहून ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. घटनेनंतर पोलिसांनी भरधाव टिप्परचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतलं.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं टिप्पर चालकाने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. घडलेला प्रकार हा अपघात आहे की घातपात? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: 'जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत, आमदाराने दिले १० ते १५ लाख'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT