Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray Group Dasara Melava : आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्या असत्या, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Dasara Melava Speech : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बदलापूर प्रकरणावरून महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे.

Satish Kengar

''त्या शिंदेला गोळ्या घातल्या. चांगलेच झाले. आनंद दिघेंनीही पहिल्यांदा शिंदेला गोळी घातली असती. आई-बहिणीवर वार करतो, त्याला गोळी घातलीच पाहिजे. शिंदेला मारायलाच पाहिजे होतं'', असं बदलापूर प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर शिवसैनिकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शिंदेला गोळी का घातली. इतरांना वाचवण्यासाठी शिंदेला गोळीला घातली असेल तर त्याचा उलगडा घातला पाहिजे. महिलांवर अत्याचार घालणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही.''

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, ''नागपूरला मी गेलो. मी शहरी आहे, मला शेतीमधील कळत नाही, पण मला शेतकऱ्याचे अश्रू दिसतात. नागपूरमधील लोकांनी सांगितलेली परिस्थिती वाईट आहे. शेतीमधील कशालाही भाव नाही. संत्र्याला डिंक्या रोग येतो. तो खोड पकडून येतो. दुसरा कापसाच्या बोंडावर येते, ती गुलाबी आळी. ती जॅकेट घालते की, नाही माहित नाही.''

'दोन महिन्यात आमचे सरकार येतंय '

महायुती सरकारला इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''दोन महिन्यात आमचे सरकार येतंय. लोकांच्या कामाचे नसणारे अनेक निर्णय रद्द करु... १८ दिवसात १६०० निर्णय घेतले, यातील अनेक रद्द करु.. अधिकाऱ्यांनी पापात सहभाऊ होऊ नये. अन्यथा अधिकाऱ्यांवरही गुन्हा दखल करु, तुरुंगात टाकू.''

ते म्हणाले, ''महाराष्ट्राचे तीन लाख कोटी रुपये उधळून टाकले. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत त्यांनी आज घेतली. त्यांनी आधीच कर्ज काढले. आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय, म्हटल्यावर आपणच शहर जाळून टाकायचं. विरोधक आलेच तर त्यांच्या हातात काही नाही, असे यांचं धोरण आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

SCROLL FOR NEXT