Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut on Eknath Shinde Group Mla: शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असून आजही ४ आमदारांनी मला संपर्क केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

Satish Daud

Sanjay Raut on Eknath Shinde Group Mla: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असून आजही ४ आमदारांनी मला संपर्क केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना सत्तेत बसवलं आहे, अजित पवार यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडून गेलो आहे, असं शिंदे गटातील आमदार म्हणत होते पण त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असंही राऊतांनी म्हटलं आहे.

'शिंदे गटातील आमदारांनी मला संपर्क केला'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. यातील ४ आमदारांनी मला आजच संपर्क केला, असा दावाही संजय राऊत यांनी केला. अजित पवारांच्या येण्यामुळे वाढ झाली आहे. आमच्या पुन्हा विचार करा असं म्हणत शिंदे गटातील बहुसंख्य आमदार आम्हाला निरोप पाठवत आहेत, असंही राऊत म्हणाले.

मनसे-ठाकरे गट युतीबाबत राऊतांचं मोठं विधान

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरूवारी संजय राऊत यांची भेट घेतली. यावरून मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांच्यासोबत आम्हाला चर्चा करण्यासाठी काही मधस्थीची गरज नाहीये.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोघे भाऊ आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची सुद्धा मित्रता असून ती सर्वांनाच माहिती आहे. युतीची चर्चा करण्यासाठी आम्हाला कुणाची मध्यस्थी करण्याची गरज नाही. दोघे भाऊ एकमेकांना कधीही फोन करू शकतात. असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

SCROLL FOR NEXT