Devendra Fadnavis Vs Sanjay Raut,  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : भाजपचं सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर.., संजय राऊतांचं थेट चॅलेंज

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Latest News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केलं आहे. देशातील महापुरूषांवर होणारी चिखलफेक थांबवा, पंडित नेहरू होते म्हणून हा देश निर्माण झाला आहे. आमचं सावरकरांवर प्रेम आहेच, पण भाजपचं सावकरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर त्यांनी सावरकरांना भारतरत्न द्या, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला चांगलचं सुनावलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं. या देशातील कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये, ज्याने स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक योगदान दिलं आहे, देशाच्या विकासामध्ये योगदान दिलं आहे. मग ते पंडित नेहरू असतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, सरदार पटेल असतील, वीर सावरकर असतील, जे नेते आज जिवंत नाही त्यांची बाजू मांडायला, त्यांची भूमिका मांडायला त्यांच्यावर चिखलफेक करून राजकारण कसलं करताहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आमचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम आहेच, पण भाजपचं सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल, तर, मग त्यांनी सावरकरांना भारतरत्न द्यावं आणि मग इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. त्यांच्या बाजूला वीर सावरकरांचा पुतळा का उभारला नाही, कर्तव्यपद निर्माण केलेलं आहे, लावा सावरकरांचा पुतळा, आम्ही येतो तुमचं स्वागत करायला, पण नाही वीर सावरकरांच्या नावाने यांना (भाजपला) राजकारण करायचं आहे. असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT