uddhav thackeray
uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

राज्यात सत्ता आणून एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे; उद्धव ठाकरेंनी सांगितली पक्षाची रणनीती

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Uddhav Thackeray News : 'माझ्या हातात काही नाही. असं बरंच काही आहे, पण आता आपल्याला एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्तानं मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मातंग समाजाचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदे आणि अशोकराजे सरवटे यांनी समाजातील लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' शिवशक्ती भीम शक्ती आणि लहू शक्ती जर एकत्र आली तर, देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो . आता मी अनुभवतो आहे की, गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आम्ही सुद्धा मंत्री होतो, पण आम्ही कधी थापा मारल्या नाहीत'.

'अण्णा भाऊ यांनी मुंबई मिळवून दिली. आता आपण काय करतोय? आता चित्र असं आहे की भूलथापा मारायच्या आणि संमोहित करायचं. आता मी घराबाहेर पडतो आहे, तरी यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे. मग मी करू तरी काय ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी मातंग समाजावर देखील भाष्य केलं. 'लहू समाज हा दुर्लक्षित राहिला हे सत्य आहे. अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई मिळवून दिली पण मुंबईमध्ये त्यांचं एक स्मारक नाही आणि त्यांना भारतरत्न अजून दिला नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल आणि भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. 'आता यांना शिवाजी महाराजांचा आदर्श जुना वाटायला लागला आहे. आज तर एका गद्दाराची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली. जसं काय शिवाजी महाराज यांच्या सुटकेला भाजपने मदत केली, अशी टीका ठाकरे यांनी केली.

'लहू यांचे वाक्य होतं की जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. पण आता जगेन तर सत्तेसाठी आणि मरेन तर सत्तेसाठी सुरू आहे. आता लवकरच मला एक मेळावा घ्यायचा आहे, ज्यात लहू शक्ती, भीमशक्ती आणि शिवशक्तींचा एकत्र असा मेळवा घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT