Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाची विचारणा

घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असा सवाल उपस्थित केला.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर घटनापीठासमोर (Supreme Court) ही सुनावणी होत आहे. दरम्यान, सुनावणीला सुरूवात होताच ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) १९ जुलैला निवडणूक आयोगात गेले होते. पण त्याआधी अनेक घडामोडी पार पडल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा आधी निर्णय लागणं गरजेचं होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. (Shivsena Supreme Court News Today)

यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असा सवाल उपस्थित केला. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला.

यावर कपिल सिब्बल यांनी हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट झाले पाहिजे, असं म्हटलं. दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले.

'शिंदे गटासमोर विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही'

आमचीच शिवसेना खरी, असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला. यावर ठाकरे गटाचे वकिल कबिल सिब्बल यांनी मूळ शिवसेना तुमची मग व्हिपचं पालन का केलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. शिंदे गटाने पक्ष सोडला नव्हता तर मग व्हिपचं पालन का केलं नाही अशी विचारणाही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

'घटनापीठासमोर प्रकरण आणण्याची स्थिती निर्माण केली गेली, असं कपिल सिब्बल कोर्टासमोर सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी २० जूनला सुरू झाल्या. २१ जूनला आमदारांची बैठक बोलावण्यात आली. ज्यात अनेक आमदार आले नाही, ते गुवाहाटीला गेले'. असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर सांगितलं आहे. आपला वेगळा गट आहोत असं ते सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडे १० व्या अनुसूचीनुसार, विलीनीकरणाचा एकमेव पर्याय आहे. असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nath Designs : नवरात्रीत नथीचा नखरा! पाहा गरबा नाईटसाठी ७ ट्रेंडिंग नथीचे डिझाइन्स, लूक दिसेल एकदम हटके

Good News: नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुण्याला जा, ई-बस सेवा होणार सुरू; तिकीटासाठी किती मोजावे लागणार?

Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

Health Tips : उशिरा उठता आणि व्यायामही करत नाही? शरीरात होऊ शकतात 'हे' गंभीर बदल, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT