शिवसेना नेत्याकडून कोरोना नियमाचं उल्लंघन, सहा जणांवर गुन्हे
शिवसेना नेत्याकडून कोरोना नियमाचं उल्लंघन, सहा जणांवर गुन्हे रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

शिवसेना नेत्याकडून कोरोना नियमाचं उल्लंघन, सहा जणांवर गुन्हे

रोहिदास गाडगे

पुणे - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे Shivsena विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे Devram Lande यांनी कोरोना काळात नियम मोडून मुलाच्या लग्नात 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवली म्हणून नवरदेवाचे वडील,सासरे व मंगल कार्यालय मालक यांच्यासह अन्य 6 जणांवर जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बारव येथे झालेला हा शाही लग्नसोहळा दोन दिवस मोठा चर्चेत होता.अनेक राजकीय मंडळी आजी माजी आमदार,आजी माजी सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थिती होते. जुन्नर,अकोला,ठाणे येथील आमदार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे, चैतन्य उल्हास मिंडे आणि सुधीर नामदेव घिगे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

28 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मौजे, बारव गावचे हद्दीत कडे जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी मंगल कार्यालय इथे हा लग्न सोहळा पार पडला. याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तसेच सध्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. पुण्यात सध्या जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील सदर ठिकाणी देवराम सखाराम लांडे यांनी जमाव जमवून गर्दी केली आहे. म्हणून जुन्नर पोलीसांनी ही कारवाई केली असून जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

Mothers Day 2024: मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मातृदिन? जाणून घ्या कारण

Sharad Pawar: आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात; शरद पवारांचं भाकित, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

World Thalassemia Day : आनुवंशिक थॅलेसेमियापासून आपल्या मुलांना वाचवा; लग्नाआधी करा हे काम

Mumbai Water Stock News: मुंबईकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपातीचं संकट टळलं; ७ तलावांमध्ये फक्त इतकाच पाणीसाठा

SCROLL FOR NEXT