Sanjay Raut Live - Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Live: - फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज त्यांना बुडवणार - राऊत

जाणून घ्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

साम टिव्ही

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. राऊत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन-आशिष शेलार-चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, याबाबात अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मुंबईच्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होत आहे. संबंध महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

- मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंटमॅन

- हा कंबोज एक दिवस फडणवीसांना बुडविणार

- असा तुरुंग नाही ज्यात मला दोन वर्षे ठेवतील

- ज्या दिवशी माझ्या नातेवाईक, दोस्तांवर छापे होत होते त्या रात्री मी अमित शहांना फोन केला होता

- जे चालले आहे ते ठीक नाही हे सांगितले होते.

- आपली दुष्मनी माझ्याशी तर मला अटक करा असे सांगितले होते

- विरोधकांना धमकावणं ही तुमची लोकशाही आहे का - राऊतांचा मोदी -अमित शहांना सवाल

- हम डरेंगे नही झुकेंगे नाही- आपको झुकाएंगे

चार महिन्यांपासून ईडीच्या नावे वसुली सुरु आहे

- सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद तीन वेळा मी ईडीला पाठवले

- जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे हे मी ईडीला विचारतो

- हे नाव ऐकल्यावर ईडीला घाम फुटेल

- चार महिन्यांपासून ईडीच्या नावे वसुली सुरु आहे

- मुंबईतले सत्तर बिल्डरांकडून वसुली होत आहे

- याची ईडीलाही माहिती आहे

- मी पंतप्रधानांना व अमित शहांना याबद्दल लिहीणार व नंतर तपशील जाहीर करणार

- फरीद शमा, रोमी हे कुणाचे एजंट आहेत

- मुंबईच्या बिल्डरांकडून ३०० कोटींची वसुली

ईओडब्य्लूने किरीट व नील सोमय्यांना अटक करावी

- राकेश वाधवानला कुणी ओळखत नव्हते

- त्याच्या खात्यातून २० कोटी पक्षनिधी म्हणून भाजपला गेले आहेत

- ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यू, पंतप्रधान आणि गृहमंत्री मी काय बोलतो हे ऐकत असतील

- निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे हे विचारतो. ही कंपनी निल किरीट सोमय्यांची आहे आणि तो राकेश वाधवानचा पार्टनर आहे.

- पीएमसी बँक घोटाळ्यात वाधवानला ब्लॅकमेल करुन कोट्यवधींची जमीन आपला फ्रंट मॅन वसईचा लाडानी या नावाच्या माणसाच्या नावावर घेतली आणि रोख रक्कमही घेतली

- निकाॅन फेज १ आणि फेज २ हे कोट्यवधींचे प्रकल्प. निल सोमय्या या कंपनीचा पार्टनर

- या प्रकल्पांना पर्यावरण क्लिअरन्स नाही

- या प्रकल्पांत पीएमसी बँकेचा पैसा

माझ्याकडे पाच हजार कोटींच्या घोटाळ्यांचा तपशील

काय म्हणतात राऊत...

- एका वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात ९०० कोटींचा सेट होता

- हरियाणातला एक दूधवाला ५ वर्षांत ७ हजार कोटींचा मालक कसा

- अमोल काळे कोण आहे, त्याला कुठे लपवले आहे

- फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा

- महाआयटीमध्ये २५ कोटींचा घोटाळा

-

माझ्या बँकेच्या खात्यांचे वीस वर्षांचे तपशील ईडीने नेले - राऊत

- माझ्या ५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करते आहे

- या साठी धमक्या देताहेत, दादागिरी करताहेत

- या सगळ्यांचे नोटींग झाले आहे. बघू २०२४ नंतर काय करायचं त्यांचं

- माझ्य मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्याकडेही ईडीवाले गेले, नेल पाॅलीश करणाऱ्याकडेही गेले, हे काय ईडीचे काम आहे?

'ते' १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन -राऊत

- किरीट सोमय्यांनी १९ बंगल्यांबद्दल जे आरोप केलेत ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन असे आव्हान संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना दिले आहे.

- मराठी भाषेच्या विरोधात गेलेला हा दलाल. याचे थोबाड बंद करा नाहीतर आम्ही करु..संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर थेट शरसंधान

संजय राऊत यांनी केला किरीट सोमय्यांचा मुलुंडचा दलाल असा उल्लेख-

- उद्धवजींनी मला सांगितले आहे लोकांसमोर वस्तुस्थिती येऊ द्या.

- आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो

- हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे

- ही बाहेरची लोकं आमच्यावर दादागिरी करणार आणि भाजपवाले टाळ्या वाजवणार हा निर्लज्ज पणाचा कळस आहे

- शिवछत्रपतींच्या या राज्यात असे कधी घडले नव्हते

- उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावर रोज आरोप करतात

- तो XXX म्हणतो (किरीट सोमय्या) ठाकरे कुटुंबाने कोर्लई गावात १९ बंगले बांधले आहेत

- आपण बसेस करु तिथे जाऊ...जर बंगले दिसले नाहीत तर त्या दलालाला (किरीट सोमय्या) शिवसेना जोड्याने मारेल

राऊत म्हणतात....

- सध्या पवार कुटुंबावर धाडी पडताहेत

- आम्ही त्यांनाही टाईट करु असे सांगितले जात आहे

- मविआच्या आमदारांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे

- पवार कुटुंबियांनाही धमक्या दिल्या जात होत्या

- मला सांगत होते आघाडीतून बाहेर पडा

राऊत पत्रकार परिषदेतले मुद्दे-

- केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर दबावासाठी केला जातोय

- तुम्ही सरेंडर व्हा अन्यथा कारवाई करु अशा धमक्या दिल्या जाताहेत

- भाजपचे लोक सरकार पाडायच्या रोज नव्या तारखा देताहेत

राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.....

- याच वास्तूच्या खाली अतिरिक्यांकडून बाँबस्फोट झाले आहे. सेना प्रमुखांबरोबर काम केलेल अनेक नेते आज उपस्थित आहेत.

-महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांचे मला फोन आले. सर्वांनी आपल्या पत्रकार परिषदेला आशिर्वाद दिले आहेत. शरद पवारांनीही मला फोन केला होता. मला सर्व प्रमुख नेत्यांनी सांगितलं तुम आगे बढो

- कुणीतरी रणशिंग फुंकायला हवे होते. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर जे आक्रमण सुरु आहे. त्या विरोधात आपण शिवसेना भवनातून रणशिंग फुंकतो आहे.

- शिवसेना प्रमुख सांगायचे महाराष्ट्र XXची अवलाद नाही. तुम्ही कुणाच्या बापाला घाबरु नका. शिवसेना कुणालाही घाबरणार नाही. महाराष्ट्र xxची अवलाद नाही हा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे.

कुणावर पडणार राऊतांचा बाॅम्ब                                                               

मुंबई : भाजपच्या साडेतीन जणांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर राजकीय क्षेत्राची उत्सुकता वाढली आहे. राऊत यांच्या मनातले हे नेते कोण, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. राऊत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणार की किरीट सोमय्यांवर तोफ डागणार, गिरीश महाजन-आशिष शेलार-चंद्रकांत पाटील यापैकी कोण नेते राऊतांच्या रडारवर असतील, हे आता काही वेळातच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT