mahesh gaikwad news  Saam tv
मुंबई/पुणे

...तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा, प्रशासनात खळबळ

Kalyan politics : कल्याणमधील नागरिकांच्या प्रश्नावरून शिंदे गटाच्या नेत्याने अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

कल्याणमधील रस्त्यांची दुरवस्था

महेश गायकवाड यांचा अधिकाऱ्यांनाच इशारा

गायकवाड यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतील तिसगाव पाडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत शिवसेना संपर्क प्रमुख आणि नगरसेवक महेश गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी परिसरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका करत इशारा दिला.

तिसगाव पाडा परिसरात काही बिल्डरांच्या सोयीसाठी जाणूनबुजून रस्ते अरुंद ठेवण्यात आल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला. रस्ते अडवले गेल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन वाहन किंवा रुग्णवाहिका या भागात वेळेत पोहोचू शकत नसल्याने भविष्यात गंभीर प्रसंग ओढवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

महेश गायकवाड म्हणाले, नागरिकांना जर अशाच प्रकारे त्रास सहन करावा लागला तर जबाबदारी अधिकाऱ्यांची असेल. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही. गरज पडली तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल'.

महापालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यांचे काम योग्य पद्धतीने करावे, तसेच बिल्डरधार्जिण्या निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने केडीएमसी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही रस्त्यांच्या समस्यांबाबत आपली व्यथा मांडत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्याचं दुर्दैव आहे, शासन व प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही - यशोमती ठाकूर

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT