Uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

मुंबईची ओळख पुसण्याचा भाजपचा प्रयत्न; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

केंद्र सरकारने अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: केंद्र सरकारने अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली असल्याची बोलले जात आहे. मुंबईची ओळख पुसण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यासह अजून कोविड गेला नसताना बिकेसी कोविड सेंटर डीसमेंटल करण्याचे आदेश दिले आहेत, कोविड काळात देशात नव्हे तर जगात मुंबई मॉडेलची चर्चा झाली, त्याचं सेंटर बिकेसी कोविड सेंटर होते, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवरील बैठकीत केला असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने गुजरात अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बीकेसी येथील ४.८२ हेक्टर जागा बुलेट ट्रेनसाठी लागणार आहे. यासाठी कोविड गेलेला नसताना बिकेसी कोविड सेंटर डीसमेंटल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोविड काळात देशात नव्हे तर जगात मुंबई (Mumbai) मॉडेलची चर्चा झाली होती. तेच सेंटर बिकेसी कोविड सेंटर होते ते आता डीसमेंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हे देखील पाहा

बुलेट ट्रेनचा फायदा हा मुंबईकरांना होणारा नाही. भाजप मुंबईची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे, त्या दिशेने पाऊले जात आहेत. अशी रोखठोक प्रतिक्रिया या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याबाबत मातोश्रीतील वरिष्ठ खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT