Mahesh Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Politics: शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल

Kalyan News: काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. आता पुन्हा महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. आता महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

फेसबूक अकाऊंटवरुन दीपक कदम नावाच्या इसमाने ही धमकी दिली असून या प्रकरणी महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जमीनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील त्यांचा मुलगा वैभव गायकवाड हा फरार आहे. या घटनेला काही महिने उलटत नाही, तोच महेश गायकवाड यांना पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबूक अकाऊंटवरुन महेश गायकवाड यांना धमकी दिली आहे. 'भाजप आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या, मी आठ गोळ्या घालीन', अशी जीवे ठार मारण्याची धमकी कदम याने महेश गायकवाड यांना दिली आहे. ही धमकी येताच महेश गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल मिडियाद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल फेसबूक अकाऊंटद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय.

धमकी देणारा कदम हा कोण व्यक्ती आहे? त्याने अशा प्रकारे महेश गायकवाड यांना का धमकी दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासअंती होणार आहे. तर याबाबत बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, ''तीन महिन्यापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता, त्यामधील काही आरोपी अजून पसार आहेत , त्या हल्ल्यातील आरोपीचे नाव घेऊन मला धमकी दिली. या घटनेला तीन महिने झाले. मात्र फरार आरोपींना अद्याप पकडले नाही. यामध्ये कुणाचा राजकीय कुणाचा राजकीय दबाव आहे. मी काही दिवसांनी सांगेल पोलिसांनी या फरार आरोपींना अटक करावी, आताच्या धमकीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल करत अटक करू असा आश्वासन दिल्याचे सांगितलं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT